मुंबईतील भाटिया रुग्णालयाजवळील इमारतीच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, 6 जणांचा मृत्यू
नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाची होती.
मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये (BMC) गेल्या काही दिवसांपासून इमारतींना आग (Fire Borke Out) लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे. नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाची होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. कमला इमारत 20 मजल्यांची असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या आगीच्या घटनेत 15 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमला इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी 13 फायर इंजिन घटनास्थळी दाखल असून सात जंम्बो टॅंकर आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे.