Mumbai | मुंबईतील वरळीत होणाऱ्या कोस्टल रोडविरोधात कोळी बांधवांचं आंदोलन
गेल्या आठ दिवसांपासून वरळी कोळीवाड्यातील नाखवा आणि सर्वोदय या दोन सोसायट्यांमधील मच्छीमारांनी भर समुद्रात कोस्टल रोड च्या कामाच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आणि कोस्टल रोडचे काम बंद पाडले.
गेल्या आठ दिवसांपासून वरळी कोळीवाड्यातील नाखवा आणि सर्वोदय या दोन सोसायट्यांमधील मच्छीमारांनी भर समुद्रात कोस्टल रोड च्या कामाच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आणि कोस्टल रोडचे काम बंद पाडले. कोस्टल रोडच्या बांधणीसाठी तयार होणाऱ्या दोन पिलर मधील मधील अंतर हे शंभर मीटर करण्यात याव जेणेकरून मासेमारी करणाऱ्या बोटींना समुद्रातून ये जा करण्यसाठी समुद्रात मार्ग उपलब्ध होईल. तसेच कोस्टल रोडचे काम करणाऱ्या कंपन्या मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या मासेमारी चे जाळे कापतात त्यामुळे मच्छीमारांचा खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात आज वरळी मधील मासेमारी आणि मासे विक्री करणाऱ्या कोळी बांधवानी हे आंदोलन पुकारलेल आहे.
स्थानिक आमदार आणि मंत्री महोदय आदित्य ठाकरे यांचं लक्ष वेधण्यासाठी आज वरळी गावांमधून मासेमारी विक्री करणाऱ्या महिलांकडून तसेच वरळी गावातला रहिवाशांकडून आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. या आंदोलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला. मुख्यत्वे महिलांचा खूप मोठा पाठिंबा होता. या आंदोलनाकडे सरकार आता कोणत्या पद्धतीने पाहणार आहे. कोळी बांधवांच्या या समस्यांच्या संदर्भात काही निर्णय घेणार आहेत का हे पाहणं खर तर महत्वाचं ठरणार आहे