मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करताय? तुमच्यासाठी मोठी बातमी, परशुराम घाट इतके दिवस राहणार बंद
VIDEO | मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, परशुराम घाटातील वाहतूक 'या' पर्यायी मार्गाने राहणार सुरू, बघा कोणता आहे तो रस्ता?
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. या मार्गावर असणाऱ्या परशुराम घाटाची वाहतूक बंद राहणार आहे. येत्या २७ एप्रिल ते ३ मे पर्यंत परशुराम घाट हा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. परशुराम घाट हा १ आठवडा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने या दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. दरम्यान, आठवडाभर हा घाट बंद राहणार असून या घाटाच्या चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं एनएचएआयकडे केली आहे. जर हे काम आता करण्यात आलं नाही तर अर्धवट स्थितीत असलेला हा परशुराम घाट पावसाळ्यात प्रवाशांची डोकेदुखी ठरू शकतो असेही सांगितले जात आहे. परशुराम घाट हा साधारण पावणे तीन किलोमीटरचा असून यापैकी केवळ ५०० मीटरचे चौपरीकरण करण्याचे काम शिल्लक आहे. तर दीड किलोमीटरच्या सुरक्षा भिंतीला भराव करण्याचे कामही बाकी असल्याची माहिती मिळत आहे.