Monsoon Update | मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

| Updated on: Jun 10, 2021 | 8:59 AM

त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली.

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला जोरदार पावसाने झोडपलं. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले होते. (Mumbai Heavy Rain Alert By IMD Monsoon)

Aurangabad | पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे पडले महागात, दोन तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेले
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7.30 AM | 10 June 2021