Mumbai | मुंबईत हॉटेलसाठी लवकरच शिथिलता ?

Mumbai | मुंबईत हॉटेलसाठी लवकरच शिथिलता ?

| Updated on: Jun 20, 2021 | 10:18 PM

मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, हॉटेल व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी शिष्टमंडळाला नव्या आदेशाबाबत आश्वासन दिल्याची माहिती मिळतेय.

मुंबईतील रुग्णसंख्या घटली असली तर मुंबईत अद्याप लेव्हल 3 चेच नियम लागू आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल ठराविक वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातही फक्त पार्सल सुविधा सुरु ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, हॉटेल व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी शिष्टमंडळाला नव्या आदेशाबाबत आश्वासन दिल्याची माहिती मिळतेय.

Published on: Jun 20, 2021 10:17 PM