राजकारणातलं पॉवरफुल शहर, ६ खासदार अन् ३६ आमदार पण लोकसभा मतदारसंघाना नावं का नाही?
६ खासदार आणि ३६ आमदार असणारं मुंबई हे एकमेव शहर आहे. उत्तर मध्य, दक्षिण पूर्ण आणि इशान्य अशा नावांमुळे बहुसंख्य मुंबईकरांना मतदारसंघ सांगताना गोंधळ उडतो म्हणून मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतराआधी मुंबईतील लोकसभा मतदारसंघांच्या नामांतराची गरज
मुंबई, २१ मार्च २०२४ : उत्तर मध्य आणि दक्षिण पूर्व यासारख्या मतदारसंघाच्या नावामुळे मुंबईतील मतदारसंघ सांगताना अनेकांचा गोंधळ उडतो. दरम्यान, मुंबईतील सहाही लोकसभा मतदार संघाला अद्याप नावं का दिली गेली नाहीत, असा सवालही केला जात आहे. तब्बल ६ खासदार आणि ३६ आमदार असणारं मुंबई हे एकमेव शहर आहे. उत्तर मध्य, दक्षिण पूर्ण आणि इशान्य अशा नावांमुळे बहुसंख्य मुंबईकरांना मतदारसंघ सांगताना गोंधळ उडतो म्हणून मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतराआधी मुंबईतील लोकसभा मतदारसंघांच्या नामांतराची गरज आहे. मुंबईमधील मतदारसंधाच्या नावाचं वर्गीकरण केलं असलं तरी अनेकांचा संभ्रम निर्माण होतोय. कशी आहे मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांची रचना? कोणकोणते भाग या मतदारसंघात येतात बघा टिव्ही ९ चा स्पेशल रिपोर्ट
Published on: Mar 21, 2024 01:32 PM
Latest Videos