Lalbaug Cha Raja Video : पाऊस येऊ दे किंवा वादळ! गणेशभक्तांचा उत्साह कालपण, आजपण आणि उद्यापण
पावसापासून वाचवण्यासाठी काहींनी लगेचच छत्र्या उघडल्या. तर काही भक्तांनी मात्र पावसात भिजणंच पसंत केलं. तासनतास रांगेत उभं राहून क्षीण आलेल्या भक्तांचा उत्साह अचानक आलेल्या पावसाने वाढवला.
मुंबई : मुंबईतील लालबागच्या राजासाठी (Lalbaug Cha Raja) भक्तांची गर्दी यंदाही कमी झालेली नाही. रात्रभर रांगेत उभं राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना पावसानेही चकीत केलं. पण गणेशभक्तांचा (Ganesh festival in Mumbai) उत्साह पावसामुळे जराही कमी झाला नाही. गणेशभक्तांचा उत्साह उलट पावसामुळे अधिकच वाढला. लालगाबचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दर्शन रांगेत असलेल्या भाविकांना सकाळी अचानक आलेल्या पावसाने चिंब (Mumbai Rain) भिजवलं. पावसापासून वाचवण्यासाठी काहींनी लगेचच छत्र्या उघडल्या. तर काही भक्तांनी मात्र पावसात भिजणंच पसंत केलं. तासनतास रांगेत उभं राहून क्षीण आलेल्या भक्तांचा उत्साह अचानक आलेल्या पावसाने वाढवला. गणपत्ती बाप्पा मोरया, चा जयघोष यावेळी रांगेत गणेशभक्तांकडून केला गेला. पावसामुळे तारांबळ उडेल असं वाटत असतानाच मुखदर्शनची रांग मात्र जराही डगमगली नाही. भरपावसातही बाप्पाचं दर्शन विनाअडथळा सुरु असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.