बदलापूर स्थानकातील परिस्थिती जैसे थे… 7 तासांपासून लोकल ट्रेन अद्याप ठप्प, आंदोलकांची माघार नाहीच
रेल रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी वारंवार विनंती करून देखील आंदोलक माघार घेताना दिसत नाही. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे पाहायाला मिळाले. बघा सध्या कशी आहे परिस्थिती?
बदलापूरातील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर शाळेतच सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन मुली लघुशंकेसाठी जाताना हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर १२ तास उलटून गेल्यानंतरही शाळेतील व्यवस्थापनाविरोधात बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केला, यामुळे बदलापुरकर प्रचंड आक्रमक झाले आहे. इतकंच नाहीतर त्यांनी शाळेच्या बाहेरच आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केल आहेत काही नागरिक थेट रेल्वे रूळावर उतरून जोपर्यंत आरोपीला फाशी नाही तोपर्यंत माघार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सकाळी ९. ३० ते १० वाजेपासून नागरिक रेल्वे रूळावर आंदोलन करत असल्याने रेल्वे लोकलसह लांबपल्ल्याच्या गाड्या गेल्या ७ तासांपासून ठप्प आहे. सकाळपासून सुरु झालेल्या या रेल रोकोवर अजूनही तोडगा न निघाल्याने मध्ये रेल्वे ठप्प असून अंबरनाथ आणि कर्जत दरम्यानच्या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. बघा बदलापूर स्थानकात सध्या कशी आहे परिस्थिती?