BJP Raibharo Protest | भाजपचं रेलभरो आंदोलन, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर आक्रमक
भाजपने रेलभरो आंदोलनाला सकाळपासून सुरुवात केली आहे. मुंबई लोकलमध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा द्यावी, या मागणीसाठी भाजप आक्रमक झाले आहे. यावेळी प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासह इतर नेतेही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मागील बराच काळापासून मुंबई लोकल ट्रेनमध्ये सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना प्रवासाची मुभा आहे. आता मात्र दोन डोस घेतलेल्यांना प्रवास करण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी भाजपने आज रेलभरो आंदोलन केलं आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला. तिकडे कांदिवली इथंही भाजपचं आंदोलन सुरु होतं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आमदार अतुल भातखळकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Latest Videos