मुंबईकरांनो… ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद, प्रवाशांचा खोळंबा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये पावसाने अचानक एन्ट्री घेतल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली. मोठ्या वादळी वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याची माहिती आहे. यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळीच मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे सिग्नल आणि पॅनल यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.२५ वाजता घडली. त्यानंतर आता पुन्हा मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक कोलमडल्याचे समोर आले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये पावसाने अचानक एन्ट्री घेतल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली. मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेचे वाहतूक बंद आहे. मोठ्या वादळी वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याची माहिती आहे. यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. तर वादळी वारे आणि पावसामुळे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरही याचा परिणाम पाहिला मिळाला. घाटकोपर ते वर्सोवा हा मेट्रो मार्गही तांत्रिक अडचणींमुळे बंद पडला आहे.