Mega Block | मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडताय? तिनही रेल्वे मार्गावर कसा असणार ब्लॉक?
VIDEO | उद्या तुम्ही घराबाहेर पडणार असाल किंवा रेल्वेने बाहेर जाण्याचा तुमचा काही प्लान असेल तर रेल्वेचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा, बघा कसा असणार रेल्वेच्या तिनही मार्गावर ब्लॉक?
मुंबई, ९ सप्टेंबर, २०२३ | उद्या तुम्ही घराबाहेर पडणार असाल किंवा रेल्वेने बाहेर जाण्याचा प्लान असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा कारण उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे…उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार या अप-डाऊन मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकचा वेळ सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत असणार आहे तर हार्बर रेल्वे मार्गावर उद्या सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published on: Sep 09, 2023 11:56 AM
Latest Videos