Mumbai | मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांसाठी रेल्वेचं महत्त्वाचं आवाहन
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल. तिकडे ट्रान्स हार्बर मार्गावर चुनाभट्टी ते वांद्रे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी दरम्यान देखील मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल. तिकडे ट्रान्स हार्बर मार्गावर चुनाभट्टी ते वांद्रे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी दरम्यान देखील मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.44 या वेळेत सुटणाऱ्या जलद सेवा देणाऱ्या सर्व ट्रेन माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे डाऊन फास्ट मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि त्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. अशी माहीती आहे. टेक्निकल कामांसाठी हा ब्लाॅक घेण्यात आल्याची माहीती रेल्वे प्रशासनाने दिलीये. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी याची माहीती घेणं आवश्यक आहे.
Published on: Jan 16, 2022 11:16 AM
Latest Videos