हे अत्यंत वाईट…आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
मराठी चित्रपट विश्वातील अभिनेते आदेश बांदेकर हे पवई येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी केले असता ईव्हीएम मशीन बंद असल्याने त्यांना बऱ्याच वेळ तातकळत थांबावे लागले, याच प्रकारावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. बघा काय म्हणाले?
लोकसभेच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीसुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. मराठी चित्रपट विश्वातील अभिनेते आदेश बांदेकर हे पवई येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी केले असता ईव्हीएम मशीन बंद असल्याने त्यांना बऱ्याच वेळ तातकळत थांबावे लागले, याच प्रकारावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पवईतील एका मतदान केंद्रावरून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 57 आणि 58 या दोन्ही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. लोकशाहीचा हा उत्सव आहे. पाच वर्षांपासून यासाठी नियोजन केले जाते. पण इथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. इथले लोक खूप चिडले आहेत. मी स्वत: दोन तासांपासून थांबलोय. मशीन बंद पडतात आणि दोन-दोन तास त्यावर काही कार्यवाही होत नाही, हे अत्यंत वाईट असल्याचे म्हणत आदेश बांदेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.