शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी लढत, संजय निरूपमांना तिकीट नाही, तर कुणाला मिळाली संधी?

शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी लढत, संजय निरूपमांना तिकीट नाही, तर कुणाला मिळाली संधी?

| Updated on: May 01, 2024 | 11:47 AM

रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांना शिंदेगटाकडून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिंदेच्या शिवेसनेकडून इच्छुक असणाऱ्या संजय निरूपम यांची उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांची थेट ठाकरे गटाशी लढत होताना दिसणार आहे.

मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाने आपले दोन उमेदवार जाहीर केलेत. रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांना शिंदेगटाकडून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिंदेच्या शिवेसनेकडून इच्छुक असणाऱ्या संजय निरूपम यांची उमेदवारी नाकारली आहे. तर आता उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेचं तिकीट दिलंय. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंची साथ सोडून रवींद्र वायकर हे शिंदे गटात सामील झाले होते. तर महिन्याभराच्या आतच त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. विशेष म्हणजे रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला मनसेकडून उघड विरोध करण्यात आला होता. भ्रष्टाचाऱ्याचा प्रचार आम्ही करायचा का? असा सवाल मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी केला होता. बघा नेमकं काय म्हटलं शर्मिला ठाकरे यांनी?

Published on: May 01, 2024 11:47 AM