... म्हणून मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पणाचा कार्यक्रम अचानक रद्द

… म्हणून मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पणाचा कार्यक्रम अचानक रद्द

| Updated on: Jun 03, 2023 | 7:16 AM

VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारं मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पण कार्यक्रम रद्द, काय झालं नेमकं ?

मुंबई : मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ शनिवारी 3 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होता. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. पंतप्रधान मोदी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे आज संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी वंदेभारत एक्सप्रेसचं स्वागत करणार होते. मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र हा वंदे भारत लोकार्पणाचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. ओडीशात झालेल्या भीषण अपघातामुळे हा उद्घाटन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम सध्या रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पुन्हा कधी हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Published on: Jun 03, 2023 07:10 AM