Rahul Gandhi : ‘एक है तो सेफ है’ भाजपच्या घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन केली अन्…
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही भाजपच्या 'एक है तो सुरक्षित है' या घोषणेवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
‘एक है तो सेफ है’ भाजपच्या घोषणेवरून राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ‘एक है तो सेफ है’ असं लिहिलेली तिजोरीच राहुल गांधी यांनी ओपन केली आणि भाजपवर हल्लाबोल केला. ‘एक है तो सेफ है’ असं लिहिलेल्या तिजोरीतून पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचा फोटो काढून राहुल गांधी यांनी टीका केली. यासोबत धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी यांनी हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक विषयांवर संवाद साधला. राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक आहे, अब्जाधीशांना मुंबईची जमीन बळकावयची आहे, महाराष्ट्रातील शेतकरी आणि गरिबांना मदत हवी आहे, अशी आमची विचारसरणी आहे. तर रोजगार आणि महागाई हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुढे ते म्हणाले, महिलांना मदत करण्यावर आमचा भर आहे, प्रत्येक महिलेच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होतील, शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. महिलांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जातींची जनगणनाही केली जाईल.