Mumbai Chembur Fire : चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू
मुंबईतील सिद्धार्थ कॉलनीमध्ये मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
मुंबईतील सिद्धार्थ कॉलनीमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला. मुंबईतील चेंबूरमध्ये लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले असता आग विझवण्यात त्यांना यश आले आहे. चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे सव्वा पाच वाजेच्या दरम्यान आग लागली. घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते. या दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला सुरुवातीला आग लागली आणि या आगीचा भडका उडाला यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पॅरिस गुप्ता (7), मंजू प्रेम गुप्ता (30), अनिता प्रेम गुप्ता (39), प्रेम गुप्ता (30), नरेंद्र गुप्ता (10), विधी गुप्ता (15), गितादेवी गुप्ता (60) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?

नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'

औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
