Koshori Pednekar : ‘बसवराज बोम्मईसारख्या मस्तवाल आणि नालायक मुख्यमंत्र्यावर मोदींनी कारवाई करावी’
बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) मस्तवाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याच सरकारमधला मुख्यमंत्री असली नालायक कामं कशी करू शकतो? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Koshori Pednekar) यांनी उपस्थित केलाय.
छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)चा झालेल्या अवमानप्रकरणी महाराष्ट्र शांत बसणार नाही. हिंदुस्थानच्या पटलावर असणारं भाजपाचं कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) मस्तवाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याच सरकारमधला मुख्यमंत्री असली नालायक कृत्यं कशी करू शकतो? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पंतप्रधानांकडून अपेक्षा असल्याचंही त्या म्हणाल्या.
Latest Videos