Kishori Pednekar | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांकडूनओबोरॉय मॉलची पाहणी
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मुंबईत कडक निर्बंध लावण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. मॉल्स धारकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होतंय की नाही? यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून पाहाणी करण्यात आली.
मुंबई : आज गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा तर कामाला लागली आहेच, मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याही फिल्डवर उतरल्या आहेत. मुंबईत महापौराकडून सध्या अनेक ठिकाणी पाहणी सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्रावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. आज राज्यात तब्बल 8 हजार 26 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यातले 5 हजार 428 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. त्यामुळे पालिका प्रसासन अलर्ट मोडवर आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दी होऊ नये यासाठी पालिका प्रशासन आणि महापौरांना कंबर कसली आहे.
महापौरांची मॉलला अचानक भेट
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मुंबईत कडक निर्बंध लावण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. मॉल्स धारकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होतंय की नाही? यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून पाहाणी करण्यात आली. मुंबईतील ओबेरॉय मॉल, ग्रोव्हल मॉल आणि अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलमध्ये महापौर किशोरी पेडणेकरांनी अचानक भेट दिली.