नारायण राणे फुटल्यानंतर भाई गोवेकरांचा आजही पत्ता नाही - किशोरी पेडणेकर

नारायण राणे फुटल्यानंतर भाई गोवेकरांचा आजही पत्ता नाही – किशोरी पेडणेकर

| Updated on: Jul 23, 2022 | 3:44 PM

"नारायण राणे फुटल्यानंतर भाई गोवेकरांचा आजही पत्ता नाही. अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्याच्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो. पण कधीही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या संस्कारामुळे त्यांनी कधीही या गोष्टीचा उल्लेख केला नाही"

मुंबई: “नारायण राणे फुटल्यानंतर भाई गोवेकरांचा आजही पत्ता नाही. अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्याच्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो. पण कधीही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या संस्कारामुळे त्यांनी कधीही या गोष्टीचा उल्लेख केला नाही. मुळात कोणी कुणाला अशा सुपाऱ्या देणं, मारण्याची कुठल्याच पक्षात प्रथा, परंपरा नाही” असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. “आता इथे कोणी कोणाचा व्यक्तीशा राग करत नाहीय. शिवसेना संपवायची आहे. प्रादेशिक पक्ष संपवायचेत. त्यासाठी सुपारी घेतलीय” असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.