Mumbai Metro | मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी गूड न्यूज ! मेट्रोनं प्रवास करताना अपघात झाला तरी नो टेन्शन !
VIDEO | मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ ने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बघा व्हिडीओ
मुंबई : महामुंबई मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. आता मेट्रोनं प्रवास करताना अपघात झाला तरी नो टेन्शन… महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने मेट्रो लाइन ७ आणि २ A ने प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये मुंबई मेट्रोने वार्षिक विमा पॉलिसी घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. पॉलिसीचा लाभ घेण्याच्या निर्णयावर विश्लेषण केल्यानंतर आणि ट्रांझिट दरम्यान उद्भवू शकणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. यामुळे, मुंबई मेट्रो नेटवर्कमधून प्रवासी आपला प्रवास सुरक्षित करत चिंतामुक्त करू शकणार आहे. मेट्रोने प्रवास करताना अपघात झाल्यास व्यक्तीला उपचारांसाठी १ लाख मिळणार आहेत. तर मेट्रोमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रूपये दिले जाणार आहे. किंवा प्रवासातील अपघातात अंपगत्व आल्यास ४ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे.