मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार

| Updated on: Sep 24, 2024 | 5:25 PM

मुंबईकरांना मेट्रोने प्रवास करताना सुसज्ज सुविधा तसेच सुरक्षित प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. मेट्रोच विशेष म्हणजे नियंत्रण कक्ष या नियंत्रण कक्षात विविध अत्याधुनिक सुविधा लावण्यात आल्या आहेत. मेट्रोत प्रवेशाकरता फलाटावरच फुल स्क्रीन डोअर असणार आहे. रुळांवरचे अपघात किंवा आत्महत्येची 0 टक्के शक्यता यामध्ये असणार आहे, तसेच ही स्थानकं इंडिकेटर, एक्सलेटर,सीसीटीव्ही यांसारख्या सुविधांनी अद्यायावत असणार आहे.

मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अंडरग्राउंड मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झचा पहिला टप्पा BKC पासून सुरु होतो. पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असून ही मार्गिका 12.5 किमी लांबीची आहे. यात 10 स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो 3 चे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या टप्प्यातील स्थानके ही 22 ते 28 मीटर जमिनीखाली आहेत. मुंबई विमानतळाजवळील सहार रोड, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 ही स्थानके सर्वात जास्त खोलीवर आहे. मुंबई मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यात दहा स्थानकं असतील. मेट्रो लाईन 3चा प्रवास 33.5 किलोमीटर लांब आहे आणि मुंबईच्या उत्तर-दक्षिण दिशांना अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी डिझाईन केलेली आहे. हा मेट्रो मार्ग मुंबईतील सहा प्रमुख व्यावसायिक क्षेत्र, 30 कार्यालयीन क्षेत्र, शैक्षणिक संस्था, प्रमुख रुग्णालयं आणि अनेक वाहतूक केंद्रांना जोडणार आहे. याशिवाय, हा मेट्रो मार्ग शहरातील दोन्ही विमानतळांना देखील जोडतो, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. विशेष म्हणजे मेट्रो 3 मार्गिका भूमिगत असणार आहे. ही मेट्रो प्रायोगिक चाचणीत 65 किमी प्रतितास वेगानं धावणार आहे. सध्या या मेट्रोचा बांद्रा ते गोरेगाव आरेपर्यत 12.5 किमीचा ट्रायलरन करण्यात येतोय. मेट्रोची क्षमता ही 100 किमी प्रतितास प्रवास धावण्याची आहे. ही संपूर्ण मेट्रो भारतीय बनावटीची असून आंध्र प्रदेशमधील श्री सिटी येथे ही मेट्रो बनवण्यात आलीये. मुंबईत मेट्रो 3 च्या सध्या 12 गाड्या दाखल झाल्या आहेत.

Published on: Sep 24, 2024 05:25 PM