म्हाडा घरांच्या वाढत्या किंमतीवरून आव्हाड यांनी सरकारला फटकारलं; म्हणाले यात…
म्हाडाने घरांची सोडत काढली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 4 हजार 83 घरांची सोडत म्हाडा काढणार आहे. मात्र याच्याआधीच त्यांच्या किंमतीवरून विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे.
मुंबई : म्हाडाकडून मुंबईकरांना स्वस्तात आणि चांगली घरे दिली जात आहे. यावेळीही म्हाडाने घरांची सोडत काढली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 4 हजार 83 घरांची सोडत म्हाडा काढणार आहे. मात्र याच्याआधीच त्यांच्या किंमतीवरून विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे. यामुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. तसेच वाढत्या म्हाडाच्या घरांच्या किंमतीवरून फटकारत महसूलचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी आणि बिल्डर मिळून घरांच्या किंमती वाढवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच या किंमती म्हणजे गोरगरिबांच्या तोंडचा घास सरकार हिरावतय अशी टीका केली आहे. तसेच 10 ते 12 लाख रूपयांनी म्हाडाच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. महागाई इतकी वाढली आहे का? हे सरकारने स्पष्ट कराव. मला वाटतं नाहीं गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या किंमती वाढवल्या असतील असा टोला ही त्यांनी लगावला.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती

पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग

पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
