Mumbai Rain | मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, क्रांतीनगरचे स्थलांतर सुरु
मुंबईच्या मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पाणी वाढल्याने क्रांतीनगरचे स्थलांतर सुरु करण्यात आले आहेत. हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे.
मुंबईच्या मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पाणी वाढल्याने क्रांतीनगरचे स्थलांतर सुरु करण्यात आले आहेत. हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळत आहे. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये दीड ते दोन फूटांपर्यंत पाणी साचलं होतं. यामुळे दुचाकी आणि चारचाकींचे टायर देखील पाण्याखाली गेले होते तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. | Mumbai Mithi River Water Level Increases
Latest Videos