Special Report | मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात
महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) तोंडावर सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं आता कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे विरूद्ध भाजपाचे अशिष शेलार असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) तोंडावर सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं आता कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून घोषणांचा सपाटाच लावण्यात आलाय. त्यात 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांची मालमत्ता करमाफी (Property Tax) असेल किंवा महापालिकेच्या अर्थसंकल्पातील अनेक घोषणा. तर दुसरीकडे भाजप शिवसेनेला घेरण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. आता भाजपनं मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केलीय. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एकूण 25 समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या नेतृत्वाखाली यंदाची महापालिका निवडणूक भाजप लढणार असल्याचं स्पष्ट झालंय.
Latest Videos