पिंपरी चिंचवडची मेट्रो चालू झाली खरी…; अजित पवार यांचा भाजपवर निशाणा

| Updated on: Mar 24, 2023 | 8:09 AM

पिंपरी चिंचवड मेट्रोचा प्रवाशांना उपयोग होत नाही. आता फक्त वाढदिवस साजरा करणे आणि शाळेच्या ट्रिपसाठी या मेट्रोचा उपयोग होतोय

मुंबई : मुंबई, नागपूरच्या धर्तीवर पुण्याचाही विकास व्हावा. येथील वाहतूक व्यवस्था जलद आणि सुरळीत व्हावी यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली. ही सेवा पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावरच सुरू झाली. त्यात अजूनही गती आलेली नाही. यावरूनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच या कामासाठी भाजपणे घाई केली असा टोला ही लगावला. तर पिंपरी चिंचवड मेट्रोचा प्रवाशांना उपयोग होत नाही. आता फक्त वाढदिवस साजरा करणे आणि शाळेच्या ट्रिपसाठी या मेट्रोचा उपयोग होतोय असा घणाघात देखिल त्यांनी केला आहे.

Published on: Mar 24, 2023 08:09 AM
सुमित बाबाचा कॉल गेला की काम होतं; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, बघा मोठी अपडेट