VIDEO : Narayan Rane | ईडी हातात असायला केंद्रात सत्ता असावी लागते : नारायण राणे
संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये चांगलेच शितयुध्द सुरू आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या या पराभवावर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे. ठाकरे सरकारला आपले आमदार टिकवता आले नाही आणि आमदारांचाही विश्वास राहिला नाही. सत्तेसाठी 145 मते लागतात. त्यामुळे आघाडी सरकार अल्पमतात आले, असे म्हणत नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केली.
संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये चांगलेच शितयुध्द सुरू आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या या पराभवावर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे. ठाकरे सरकारला आपले आमदार टिकवता आले नाही आणि आमदारांचाही विश्वास राहिला नाही. सत्तेसाठी 145 मते लागतात. त्यामुळे आघाडी सरकार अल्पमतात आले, असे म्हणत नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाजूला व्हावे, असेही नारायण राणे बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता नारायण राणे यांच्यावर शिवसेनेकडून काय भाष्य केले जाते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.
Published on: Jun 12, 2022 02:26 PM
Latest Videos