VIDEO : Narayan Rane यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

VIDEO : Narayan Rane यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

| Updated on: Aug 30, 2022 | 2:27 PM

राज्यातील सत्तासंघर्षानंतर आरोप प्रत्यारोपाचे सत्र अजूनही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीयं. सतत एकमेकांवर आरोप केले जात आहेत. नारायण राणे यांनी आपला मोर्चा आता उध्दव ठाकरेंकडे वळवला असून राणेंनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केलीयं.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर आरोप प्रत्यारोपाचे सत्र अजूनही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीयं. सतत एकमेकांवर आरोप केले जात आहेत. नारायण राणे यांनी आपला मोर्चा आता उध्दव ठाकरेंकडे वळवला असून राणेंनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केलीयं. राणे म्हणाले की, आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली नाही. पक्षाशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केल्याचे राणे यांनी म्हटले आहे. आता शिवसेना गटातून राणेंच्या या विधानाचा समाचार नक्कीच घेण्यात येईल आणि परत एकदा राज्यात नारायण राणे विरोधात शिवसेना असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे.

Published on: Aug 30, 2022 02:27 PM