‘सगळे निर्ढावलेले अन् निर्लज्ज…’, राज ठाकरे आक्रमक होत नेमके कुणावर भडकले?
VIDEO | विधानसभेत मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेचे पडसाद, छगन भुजबळ यांच्यावर राज ठाकरे का कडाडले? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेचे पडसाद थेट विधानसभेत पाहायला मिळाले. खराब रस्ते, खड्डे आणि वाहनांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा यावरून विरोधी बाकावरील सदस्य आक्रमक झालेत आणि त्यांनी छगन भुजबळ यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रस्त्याच्या खराब स्थितीवरून सरकारवर निशाणा साधला. मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला रस्त्यावर वाहणारं पाणी, खराब रस्ते आणि खड्डे यांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अधिवेश सुरू असल्यामुळे आमदारांनादेखील मुंबई नाशिक रस्त्याचा त्रास सहन करावा लागला. सत्यजित तांबे यांनी भिवंडी बायपासचा रस्त्यांच्या खड्यांचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला. पण हा मुद्दा मांडत असताना आपण नाशिकला जात असताना ट्रेनने प्रवास करणं पसंत करतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. याच भुजबळ यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे चांगलेच आक्रमक होत ते भुजबळ यांच्यावर कडाडल्याचे पाहायला मिळाले.