'शेतकरी, बेरोजगारी, महागाई धगधगत्या निखाऱ्यावर अन् उपमुख्यमंत्री मात्र टाईमपास गप्पांसाठी शिवतीर्थावर'

‘शेतकरी, बेरोजगारी, महागाई धगधगत्या निखाऱ्यावर अन् उपमुख्यमंत्री मात्र टाईमपास गप्पांसाठी शिवतीर्थावर’

| Updated on: May 31, 2023 | 10:31 AM

VIDEO | मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बॅनरबाजी, काय लगावला खोचक टोला

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी परवा रात्री साडे १० च्या सुमारास त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. रात्री उशिरा झालेल्या भेटीमागे काहीतरी नक्की महत्त्वाचं कारणं असल्याची चर्चा होती. दरम्यान परवा रात्री शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्याशी अराजकीय गप्पा झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस रात्रीच्या भेटीवर स्पष्टच म्हणाले की, ‘बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू. त्यामुळे कालचा मुहुर्त निघाला. आम्ही गप्पा मारण्यासाठी बसलो होतो. असे ठरले होते की, या भेटीत राजकीय विषय सोडून इतर गप्पा मारायच्या…’, असे फडणवीस म्हणाले. यावरूनच मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांविरोधात बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळाले. या बॅनरवर हवालदिल शेतकरी वाऱ्यावर, बेरोजगार युवा रस्त्यावर, महागाई धगधगत्या निखाऱ्यावर अन् राज्याचे उपमुख्यमंत्री मात्र टाईमपास गप्पांसाठी शिवतीर्थावर, असे म्हणत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

Published on: May 31, 2023 10:31 AM