VIDEO : Aaji at Matoshree | मातोश्रीवर राणा दाम्पत्यांनी येऊनच दाखवावं, आजीबाईंचं आव्हान

VIDEO : Aaji at Matoshree | मातोश्रीवर राणा दाम्पत्यांनी येऊनच दाखवावं, आजीबाईंचं आव्हान

| Updated on: Apr 23, 2022 | 2:23 PM

मुंबईत शिवसैनिकांनी आज सकाळी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केलं. राणा दाम्पत्यानं घराबाहेर पडून दाखवावं, अशी धमकी दिली. त्यासाठी शेकडो शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर जमले होते. पोलिसांनी त्यांना थांबविलं. तरीही राणा दाम्पत्य मातोश्रीवर  हनुमान चालीसा म्हणण्यावरून ठाम आहेत. आमदार रवी राणा यांच्या मुंबईमधील निवासस्थानानंतर आता अमरावतीमधील निवस्थानासमोर शिवसेना व युवा सेनेचे आंदोलन सुरू झालंय.

मुंबईत शिवसैनिकांनी आज सकाळी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केलं. राणा दाम्पत्यानं घराबाहेर पडून दाखवावं, अशी धमकी दिली. त्यासाठी शेकडो शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर जमले होते. पोलिसांनी त्यांना थांबविलं. तरीही राणा दाम्पत्य मातोश्रीवर  हनुमान चालीसा म्हणण्यावरून ठाम आहेत. आमदार रवी राणा यांच्या मुंबईमधील निवासस्थानानंतर आता अमरावतीमधील निवस्थानासमोर शिवसेना व युवा सेनेचे आंदोलन सुरू झालंय. तसेच युवासेनेकडून मातोश्री समोर भजन केले जात आहे. यादरम्यान एका आजीबाईंचे राणा दाम्पत्यांना थेट आव्हान केले आहे. आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू आहे. संतप्त शिवसैनिकांनी राणांच्या घरासमोर मांडला ठिय्या मांडला. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त आहे. रवी राणांचे कार्यकर्तेही हजर आहेत.