मढ समुद्र किनाऱ्यावरील अनधिकृत स्टुडिओ प्रशासनाकडून भुईसपाट; किरीट सोमय्या म्हणाले…
मुंबईतील मालाडच्या मढ समुद्र किनाऱ्यावरील अनाधिकृत स्टुडिओ प्रशासनाकडून भुईसपाट करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमया यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळाचा आढावा घेऊन किरीट सोमया यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी...
मालाड, मुंबई : मुंबईतील मालाडच्या मढ समुद्र किनाऱ्यावरील अनधिकृत स्टुडिओ प्रशासनाकडून भुईसपाट करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमया यांच्या तक्रारीनंतर या स्टुडिओवर कारवाई करण्यात आली आहे. आज स्वत: स्टुडिओ पाडल्याच्या किरीट सोमय्या घटनास्थळावर येऊन पाहणी करत आहेत. मड मारवे येथील अनधिकृत स्टुडिओवर तोडक कारवाईची किरीट सोमय्यांकडून पाहणी करण्यात आली आहे. मालाडच्या मड मारवे या ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर सीआरझेडच्या जागेवर बांधकाम करण्यात आलेल्या 11 स्टुडिओविरोधात भाजप नेते किरीट सोमया यांनी दाखल केली होती. या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने तोडक कारवाईकरून सर्व स्टुडिओ भुईसपाट केले आहेत. आज स्वत: सोमया यांनी तोडक कारवाई झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. अनाधिकृत स्टुडिओला परवानगी देणारे आणि बांधणारे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे, असं सोमय्या म्हणाले आहेत.