…म्हणून अजित पवारांचं कालचं बंड शांत झालं, पण ते तात्पुरतं; या नेत्याच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
Ajit Pawar : अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलेलं आहे. या प्रकरणावर मनसचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा व्हीडिओ...
पुणे : अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलेलं आहे. अशातच काल स्वत : अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीचं काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. या सगळ्या प्रकरणावर मनसचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार आणि त्यांचा गट राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. 36 चा आकडा जुळला नसेल म्हणून कालचं बंड शांत झालं आहे. पण अजितदादांचे बंड हे तात्पुरतं शमलं आहे. अजित पवार पुन्हा बंड करणार नाहीत याची कुणीच खात्री देऊ शकत नाही”, असं योगेश खैरे यांनी म्हटलं आहे. “भाजपच्या अनुकूल प्रतिक्रिया देणार. अचानक कुठंतरी गायब होणार. यांचे मित्रपक्ष शंका उपस्थित करणार. यांचे आमदार यांच्यासोबत कुठंही जायला तयार आहोत म्हणणार, 24 तास बातम्यांचा धुरळा उडू देणार, समाजमाध्यमातून पक्षचिन्ह गायब होणार. आणि नंतर खापर मिडीयावर फोडणार! असं कुठं असतं व्हयं?’, असं ट्विटही खैरे यांनी केलं आहे.