काल रात्री शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक; आता काँग्रेसचा केंद्रातील बडा नेता मुंबईत येणार

काल रात्री शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक; आता काँग्रेसचा केंद्रातील बडा नेता मुंबईत येणार

| Updated on: Apr 12, 2023 | 9:59 AM

Congress : काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी. वेणूगोपाल मुंबईत येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. पाहा व्हीडिओ...

मुंबई : महाविकास आघाडीतील समन्वयासाठी आता काँग्रेसचे केंद्रीय नेते महाराष्ट्रात येणार आहेत. काँग्रेसचे हे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसचे केंद्रीय नेते के. सी, वेणूगोपाल पुढच्या आठवड्यात मुंबईत येणार आहेत. आगामी निवडणुकांची व्यूहरचना आणि सर्व विरोधी पक्षांत एकजूट-समन्वय राखण्यासाठी काल रात्री शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. विरोधी पक्षात विविध मुद्द्यांवर असलेल्या मतभिन्नतेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-पवार भेटीला महत्व आहे. महाविकास आघाडीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडे निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने अनेकदा कोंडी होते. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी के. सी. वेणूगोपाल मुंबईत येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत.

Published on: Apr 12, 2023 09:58 AM