चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या किंवा एकनाथ शिंदे तुम्ही राजीनामा द्या– उद्धव ठाकरे

चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या किंवा एकनाथ शिंदे तुम्ही राजीनामा द्या– उद्धव ठाकरे

| Updated on: Apr 11, 2023 | 1:46 PM

Uddhav Thackeray on CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची उद्धव ठाकरे यांची मागणी. पत्रकार परिषदेतून भाजप आणि शिवसेनेवर घणाघात. पाहा व्हीडिओ...

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या किंवा एकनाथ शिंदे तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बाळासाहेबांचा एवढा अपमान कधी झाला नव्हता. त्यामुळे वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजीनामा दिला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. बाळासाहेबांचं महत्व कमी करण्याची भाजपाची चाल आहे. मनावर ठेवलेला दगड भाजपाला जड होतोय. यांचं गोमुत्रधारी हिंदुत्व काही कामाचं नाही. यांचं बुरख्याचं रुप लोकांसमोर येऊ लागलंय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Published on: Apr 11, 2023 01:26 PM