लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Apr 30, 2024 | 3:50 PM

शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना महायुतीकडून मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. रवींद्र वायकर आणि अमोल किर्तीकर हे लोकसभा निवडणुकीत आमने-सामने आल्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आतापासूनच पाहायला मिळत आहे.

शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना महायुतीकडून मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा सामना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होताना पाहायला मिळणार आहे. रवींद्र वायकर आणि अमोल किर्तीकर हे लोकसभा निवडणुकीत आमने-सामने आल्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आतापासूनच पाहायला मिळत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना जाहीर होताच त्यांनी आपल्या वरिष्ठांचे आभार मानले. दरम्यान, तिकीट मिळताच त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटले, मी लोकसभेत देशाचे प्रश्न तर मांडणार तर आहेच पण माझ्या मुंबईचे सर्वाधिक प्रश्न मांडणार आहे. मला प्रश्नांची जाणीव आहे. एखादा प्रश्न विचारणे आणि त्याचे अचूक उत्तर घेणे हे माझ्या जवळ आहे. त्याप्रमाणेच मी काम करणार आहे. केवळ मी केलेली कामे पाहूनच मला उमेदवारी मिळाली. मी कधीच जाती आणि धर्माचा विचार केला नाही. मी काम करणारा आहे. निवडणुकीत उभा राहताना आपल्या समोर आव्हान असतेच. पण प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 30, 2024 03:50 PM