कॉर्डेलिया क्रुझवर ड्रग्ज सप्लाय? मुंबई पोलिसांना कोणता आला मेल? काय कारवाई?

कॉर्डेलिया क्रुझवर ड्रग्ज सप्लाय? मुंबई पोलिसांना कोणता आला मेल? काय कारवाई?

| Updated on: May 28, 2023 | 11:57 AM

आर्यन खान अटकेपासून त्याच्या सुटकेपर्यंत आणि आता अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी कारवाईपर्यंत बरेच पाणी पुलाखालून गेलं आहे. मात्र याकालावधीत कॉर्डेलिया क्रुझच्या बाबतीत कोणतीच माहिती समोर आली नव्हती

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्स प्रकरणानंतर कॉर्डेलिया क्रुझ चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर या प्रकरणाला अनेक वळण लागले. आर्यन खान अटकेपासून त्याच्या सुटकेपर्यंत आणि आता अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी कारवाईपर्यंत बरेच पाणी पुलाखालून गेलं आहे. मात्र याकालावधीत कॉर्डेलिया क्रुझच्या बाबतीत कोणतीच माहिती समोर आली नव्हती. आता मात्र पुन्हा एकदा कॉर्डेलिया क्रुझ चर्चेच्या झोतात आलं आहे. यावेळी प्रकरण ड्रग्सचेच आहे. पण त्याचा संबंध आर्यन खान नसून येथे होणाऱ्या ड्रग्स सप्लायचे आहे. या क्रुझवर एका रशियन नागरिकाकडून डिजेच्या माध्यमातून ड्रग्स पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत मुंबई पोलीसांना गोपनीय मेल आला आहे. ज्याच्या संदर्भात पोलीसांनी या मेलची दखल घेत संबंधीत यंत्रणांना अलर्ट केलं आहे.

Published on: May 28, 2023 11:57 AM