Fake Threat Call | धमकीच्या फोनच सत्र सुरूच, मुंबई पोलिसांना आता कोणाचा आला निनावी कॉल?
VIDEO | मुंबई पोलिसांना निनावी धमकीच्या फोनचं सत्र अद्याप सुरूच आहे. बोरिवलीमध्ये २० ते २५ दहशतवादी बनवताय बॉम्ब असा निनावी फोन करणारा संशयित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
मुंबई, १८ सप्टेंबर २०२३ | मुंबईमध्ये निनावी धमकीच्या फोनचं सत्र अद्याप सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईतील बोरिवलीमध्ये २० ते २५ दहशतवादी बॉम्ब बनवत असल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आल्याची माहिती मिळतेय. या निनावी फोननंतर मुंबई पोलिसांनी तपासणी केली असता काहीही आढळलं नसल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. तर मुंबई पोलिसांना मुंबईतील बोरिवलीमध्ये २० ते २५ दहशतवादी बॉम्ब बनवत असल्याचा निनावी फोन करणारा संशयित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तर दारूच्या नशेत त्याने हा निनावी धमकीचा फोन केल्याचे मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासातून समोर आले आहे.
Published on: Sep 18, 2023 11:12 AM
Latest Videos

NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?

नाव न घेत अमोल मिटकरींचा ट्विट भिडे गुरुजींना खोचक टोला
