पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

| Updated on: Feb 16, 2023 | 6:22 PM

VIDEO | भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर सांताक्रुझमधील पंचतारांकित हॉटेलबाहेर हल्ला, कुठं घडला घटना? बघा व्हिडीओ

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी थॉसोबत सेल्फी काढण्यावरून वाद झाला. यावेळी पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वी थॉ त्यांच्या मित्रांसह सांताक्रुझमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. त्यावेळी अज्ञात आरोपीने त्यांच्या जवळ जाऊन सेल्फी काढण्याची मागणी केली. पृथ्वी शॉने दोन जणांसह सेल्फी काढले मात्र आरोपींनी इतर काही जणांसोबत सेल्फी काढावा, अशी मागणी केली, यावेळी त्यांने मी जेवायला आल्याचे सांगितले आणि सेल्फी घेऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर हा वाद निर्माण झाला. यावेळी भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी थॉ आणि त्याच्या मित्राच्या गाडीवर हा हल्ला अज्ञात आरोपीकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Feb 16, 2023 06:22 PM