मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
Siddhivinayak Temple Closed : मुंबईतील प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे आजपासून पुढील चार दिवस बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातील हाजारो भाविक रोज दाखल होत असतात. भक्तांना पावणारा बाप्पा म्हणून या सिद्धिविनायक मंदिराची ख्याती आहे. मात्र आजपासून पुढील चार दिवस या मंदिरातील बाप्पाचं दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे आजपासून पुढील चार दिवस बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही. श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपनासाठी सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन भाविक-भक्तांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मूळ सिद्धिविनायक बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना ११ डिसेंबर ते येत्या १५ डिसेंबरपर्यंत घेता येणार नाही. मात्र १६ डिसेंबरपासून या मंदिरातील बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, १५ डिसेंबरपर्यंत मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. मंदिर प्रशासनाकडून मूळ मूर्तीच्या समोर प्रतिकृती तयारी करण्यात आली आहे. त्या प्रतिकृतीचे दर्शन भाविकांना पुढील पाच दिवस घेता येणार आहे.