Varsha Gaikwad : रावण दहन आदल्या दिवशी करा, राज्य सरकारचं फर्मान; वर्षा गायकवाड यांचं मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

Varsha Gaikwad : रावण दहन आदल्या दिवशी करा, राज्य सरकारचं फर्मान; वर्षा गायकवाड यांचं मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

| Updated on: Oct 21, 2023 | 1:55 PM

VIDEO | आझाद मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. दरवर्षी या मैदानात रामलिला होत असते. दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी रावण दहन केले जाते. मात्र, यंदा शिंदे गटाचा मेळावा असल्याने दसऱ्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीलाच रावण दहन करण्याचं फर्मान राज्य सरकारने काढलंय तर याचा काँग्रसेने विरोध केलाय

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान उपलब्ध व्हावं, यासाठी महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि साहित्य कला मंडळ यांना रावण वध आदल्या दिवशी करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या शिंदे सरकारचा निषेध मुंबई काँग्रेसने केला आहे. हा भारतीय संस्कृती आणि लोकांच्या श्रद्धेसोबत खेळ आहे, असं म्हणत हा निर्णय मागे घ्या, अन्यथा परिणामांची तयारी ठेवा, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. तसंच लाखो लोकांच्या श्रद्धेचा अनादर आहे. रामलीला जिथे सुरू होते, तिथेच रावणवध होणं अपेक्षित असतं. मात्र या सरकारने सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवत रावण दहन आदल्या दिवशी करा, असा सल्ला दिला आहे. भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्यांना हे शोभत नाही, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.

Published on: Oct 21, 2023 01:55 PM