Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस-वेवर ट्राफीक जाम, काय आहे कारण?
VIDEO | मुंबई पुणे एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडी, 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक संथगतीने सुरू आहे. विकेंड असल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक वाढत असल्याने लोणावळा घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी मुंबई पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर लोणावळा एक्झिट जवळ झाली आहे. मुंबई पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. सुट्ट्या संपवून आता नागरिक पुन्हा मुंबईकडे निघाले असल्याने लोणावळा एक्झिट जवळ ही वाहतूक कोंडी झाली आहे. बई पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर 4 ते 5 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. त्यामुळे सुट्ट्या संपवून घरी जाणाऱ्या नागरिकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईच्या बाजूला शनिवारी सकाळी ९.३० वाजता वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. या रांगा दोन किलोमीटरपर्यंत लागल्या. नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप होत होता. शनिवार आणि राविवारी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे महामार्ग पोलीस लक्षच देत नसल्याचे सांगितले जात आहे.