Mumbai Railway Mega block : मुंबईकरांनो… आज लोकलने प्रवास करताय? वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा…कोणत्या मार्गावर कसा ब्लॉक?
मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आज ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दिवशी लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा... कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?
मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आज ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेमार्गावरील ठाणे–कल्याणदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल सेवा विलंबाने धावतील. सकाळी ९.५० वाजताची वसई रोड- दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येणार आहे. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११.४५ वाजताची दिवा-वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील पनवेल–वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ०४.०५ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी–पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर पनवेल–ठाणे अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी–वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे–वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल सेवा उपलब्ध असेल. बेलापूर / नेरुळ–उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका उपलब्ध असतील.