मुंबईकरांनो काळजी घ्या... मुंबईतील 'या' भागात कोसळणार मुसळधार पाऊस

मुंबईकरांनो काळजी घ्या… मुंबईतील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

| Updated on: Jul 28, 2023 | 11:13 AM

VIDEO | हवामान खात्यानं मुंबईला आज कोणता दिला अलर्ट? मुंबईसह उपनगरात पावसाची कशी असणार स्थिती?

मुंबई, 28 जुलै 2023 | राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मुंबई शहरासह आज उपनगराला सकाळी साडे आठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला होता मात्र यानंतर आता साडे आठ वाजेनंतर यलो अलर्ट असणार आहे. दरम्यान, मुंबईतील अंधेरी, बोरिवली, कांदिवली आणि मालाडमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झालेली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे अंधेरी सब-वेमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. तर दादर, बांद्रा, अंधेरी, बोरिवली, कांदिवली आणि मालाड भागात दाट धुंक पसरल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे अद्यार तरी कोणत्याही वाहतूक सेवेवर परिणाम झालेला नाही. मात्र काल आणि परवा होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

Published on: Jul 28, 2023 11:05 AM