Mumbai Rain : रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये तुफान पाऊस, चार तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर ‘तो’ रेस्क्यू, Video
रत्नागिरीमधील चिपळूणमधील बहादुरशेख नाका परिसरातील एका पुलाखाली अडकलेल्या व्यक्तिला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढलं आहे. या व्यक्तिला आता रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रत्नागिरी : राज्यात पावसाचा जोर वाढलेला दिसला आहे. हवामान खात्यानेही कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला होता. हा अंदाज आता खरा ठरल्याचं दिसत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी लोकं अडकलेली असून NDRF टीम रेस्क्यू करत आहे. रत्नागिरीमधील चिपळूणमधील बहादुरशेख नाका परिसरातील एका पुलाखाली अडकलेल्या व्यक्तिला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढलं आहे. या व्यक्तिला आता रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘वाशिष्ठी’ नदीला पूर आला असून पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे.
चार तास तो व्यक्ती पाण्यामध्ये अडकून पडला होता. NDRF च्या टीमने शर्थीचे प्रयत्न करत त्या व्यक्तिला वाचवलं आहे. चिपळूमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस पडला आहे. राज्यात इतरही भागांमध्ये पावसाने थैमान घातलं असून एकसारखा पाऊस पडत असलेला पाहायला मिळत आहे.