Mumbai Rain : ट्रॅक खालील जमीन गेली वाहून, khopoli ते Karjat लोकलसेवा पुर्णपणे बंद

Mumbai Rain : ट्रॅक खालील जमीन गेली वाहून, khopoli ते Karjat लोकलसेवा पुर्णपणे बंद

| Updated on: Jul 22, 2021 | 8:52 PM

कर्जत ते खोपोली दरम्यान असलेल्या रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेलाय. त्यामुळे रेल्वे ट्रॅक अधांतरी तरंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलादी पोलाला सिमेंटचे ब्लॉक लटकलेल्या अवस्थेत हा रेल्वे ट्रॅक पाहायला मिळत आहे.

कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोकणातील अनेक भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. कर्जत ते खोपोली दरम्यान असलेल्या रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेलाय. त्यामुळे रेल्वे ट्रॅक अधांतरी तरंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलादी पोलाला सिमेंटचे ब्लॉक लटकलेल्या अवस्थेत हा रेल्वे ट्रॅक पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली लोकल लाईनवर कर्जत ते खोपोली दरम्यान केळवली ते डोलवलीदरम्यान रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेला आहे. मुंबईपासून जवळपास 105 किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला आहे.