Mumbai Rain Update : मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी

Mumbai Rain Update : मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी

| Updated on: Sep 25, 2024 | 10:59 PM

नवी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांची रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे”, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे उद्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. साधारण 15 ते 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरात झोडपून काढलं आहे. मुंबईत संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने पावसामुळे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून मुंबईत उद्या दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८.३० पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज (रेड अलर्ट) वर्तवण्यात आला आहे. सबब, नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, ही विनंती. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा”, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. यासोबतच “भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे”, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

Published on: Sep 25, 2024 10:59 PM