Mumbai Special Report | मुंबईत 4 दिवसातच रस्ते तुंबले, पाऊस ओसरल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम
मुंबई आणि इतर उपनगरात आज काय अवस्था होती, हे सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Mumbai rain update)
मुंबईतली आजची सकाळ कानठल्या बसवणाऱ्या विजांच्या कडकडाटाने झाली. पहाटेच स्फोटासारख्या कडाडणाऱ्या विजा पूर्ण दिवस कसा जाईल, याची झलक देत होत्या. पहाट झाल्यानंतर विजा धुक्यांमध्ये गळप झाल्या. जोपर्यंत मुंबईकर कामासाठी बाहेर पडतो तोपर्यंत रस्त्यांच्या झालेल्या नद्या त्यांच्यासाठी तयार होत्या. विशेष म्हणजे मुंबईचे रस्ते मागच्या चार दिवसात दुसऱ्यांदा तुंबले. सकाळी मुंबईत विजांनी तांडव केलं आणि दुपारीपर्यंत पावसाने धुडगूस घातला. आज मुंबई आणि इतर उपनगरात काय अवस्था होती, हे सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
(Mumbai rain update)
Published on: Jun 12, 2021 08:55 PM
Latest Videos