VIDEO : वडाळ्यात तुफान वाहतूक कोंडी, 5 तास एकही वाहन जागंचं हललं नाही!

VIDEO : वडाळ्यात तुफान वाहतूक कोंडी, 5 तास एकही वाहन जागंचं हललं नाही!

| Updated on: Jun 09, 2021 | 7:22 PM

मुंबईत पावसाने दाणादाण उडवली आहे. पहाटेपासून बरसणाऱ्या तुफान पावसाने रस्ते रेल्वे वाहतूक रखडली आहे. रस्त्यावर सखल भागात गुडघाभर पाणी साचलं आहे.

मुंबईत पावसाने दाणादाण उडवली आहे. पहाटेपासून बरसणाऱ्या तुफान पावसाने रस्ते रेल्वे वाहतूक रखडली आहे. रस्त्यावर सखल भागात गुडघाभर पाणी साचलं आहे. रेल्वे ट्रॅकही पाण्यात गेले आहेत. दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. दिवसभर धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेरुळावर पाणी आल्याने लोकल ठप्प झाली. त्यातूनही मार्ग काढत कामावर पोहोचलेल्या चाकरमान्यांना घरी कसे पोहोचावे हाच प्रश्न पडला आहे.  (Mumbai rains live Five hours of traffic jam in Wadala, no vehicle could move forward)