VIDEO : Sadabhau Khot On Ketaki Chitale | केतकी चितळेचा मला अभिमान सदाभाऊ खोत यांचे केतकी चितलेला समर्थन
मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं सांगतानाच तुम्ही केलं तर पाटलांच्या पोराने केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा हा प्रस्थापितांविरोधात आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केतकीचं जोरदार समर्थन केलं.
अभिनेत्री केतकी चितळे हिच्या शरद पवारांवरील पोस्टवर सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. मात्र, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केतकीच्या फेसबुक पोस्टचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचं समर्थन केलं आहे. केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं सांगतानाच तुम्ही केलं तर पाटलांच्या पोराने केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा हा प्रस्थापितांविरोधात आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केतकीचं जोरदार समर्थन केलं.
Published on: May 16, 2022 12:22 PM
Latest Videos